Pune Nagar Highway: पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; शिरूरमध्ये प्रतिकात्मक तिरडी मांडून प्रशासनाचा निषेध

Shirur Protest Over Pune Ahilyanagar Highway Safety Issues: पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील अपघातप्रवण शिरूर बाह्यवळणावर सुरक्षा उपाययोजना, अनधिकृत प्रवेशमार्ग व प्रकाशव्यवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष; प्रतीकात्मक तिरडी मांडून सामाजिक कार्यकर्त्यांचा तीव्र निषेध
Shirur Protest Over Pune Ahilyanagar Highway Safety as Activists Demand Action on Dangerous Dividers and Road Crossings

Shirur Protest Over Pune Ahilyanagar Highway Safety as Activists Demand Action on Dangerous Dividers and Road Crossings

sakal

Updated on

शिरूर : पुणे - अहिल्यानगर महामार्गावरील व विशेषतः शिरूर च्या बाह्यवळणावरील धोकादायक दूभाजक, दूभाजकांतून काढलेले अनधिकृत प्रवेशमार्ग आणि अपूऱ्या वाहतूक सुरक्षा उपाययोजनांकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांनी गेल्या सात दिवसांपासून येथील तहसिलदार कार्यालयासमोर ठिय्या दिला आहे. या गंभीर विषयाची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली जात नसल्याचा आरोप करीत त्यांनी आज आंदोलनस्थळी प्रतिकात्मक तिरडी मांडून प्रशासकीय उदासिनतेचा निषेध नोंदविला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com