pune airport
sakal
पुणे - पुण्याहून अहमदाबादला जाणाऱ्या एअर आकसाच्या विमानाला (क्यूपी -१५०९) उड्डाणासाठी तब्बल ९ तासांचा विलंब झाला. विमानात झालेला तांत्रिक बिघाड व वैमानिकाची संपलेली ड्यूटी यामुळे विमानाला उशीर झाला. मात्र, याचा प्रवाशांना मोठा फटका बसला. प्रवाशांनी पुणे विमानतळावर काही प्रमाणात गोंधळ घातला.