पुणे-अहमदाबाद साप्ताहिक रेल्वे आता कोल्हापूरपर्यंत

Railway
Railway

पुणे : प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे- अहमदाबाद- पुणे रेल्वे आता कोल्हापूरपर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. १० जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

कोल्हापूर - अहमदाबाद साप्ताहिक विशेष गाड़ी (क्र. 01050) १० जुलैपासून दर शनिवारी कोल्हापूरवरून दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी निघेल. ही गाडी हातकणंगलेला दुपारी १ वाजून ४० मिनिटांनी, मिरजला २ वाजून १० मिनिटांनी, सांगलीला २ वाजून २५ मिनिटांनी, साताऱ्याला ४ वाजून ३० मिनिटांनी, पुण्यात रात्री ८ वाजून १० मिनिटांनी पोचेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी ती अहमदाबाद येथे पोचेल.

Railway
संसाराचा अळणी खेळ, भांडायलाही द्या जरा वेळ!

अहमदाबादवरून ही साप्ताहिक रेल्वे (क्र. ०१०४९) ११ जुलैपासून दर रविवारी रात्री ८ वाजून २० मिनिटांनी सुटेल. पुण्यात दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी पोचेल. तर, साताऱ्याला सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी, सांगलीमध्ये १२ वाजून ४५ मिनिटांनी तर, मिरजला दुपारी १ वाजून १० मिनिटांनी, हातकणंगलेला दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी पोचेल. कोल्हापूरला दुपारी २ वाजून ४० मिनिटांनी ही गाडी पोचेल.

या गाडीला एक सेकंड एसी, तीन थ्री टायर एसी आणि ६ सेकंड सिटींग डबे असतील. तसेच पुणे - अहमदाबाद दरम्यानच्या स्थानकांच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com