Indian Air Force : भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य पाहून विद्यार्थी भारावले; सूर्यकिरणच्या तिरंगी धुरापासून सुखोईच्या गर्जनेपर्यंत लोहगावमध्ये रंगला हवाई प्रात्यक्षिकांचा सोहळा

Indian Air Force Air Show | Know Your Forces Pune : पुण्यातील लोहगाव हवाई दल तळावर आयोजित नो युअर फोर्सेस उपक्रमात १३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सूर्यकिरण, सारंग, आकाशगंगा आणि सुखोईच्या हवाई कसरतींनी विद्यार्थ्यांसह पुणेकरांना मंत्रमुग्ध केले.
Indian Air Force Air Show | Know Your Forces Pune

Indian Air Force Air Show | Know Your Forces Pune

esakal

Updated on: 

प्रज्वल रामटेके

पुणे : आकाशात तिरंग्याचे रंग उधळत आणि अवघ्या काही अंतरावरून एकमेकांना छेद देत झेपावणारी सूर्यकिरणची विमाने, रंगीबेरंगी ध्रुव हेलिकॉप्टरच्या चित्तथरारक कसरती, हजारो फूट उंचीवरून तिरंगा फडकावत जमिनीवर उतरणारी ‘आकाशगंगा’ची तुकडी आणि आपल्या आवाजाने संपूर्ण परिसर दणाणून सोडणारी ‘सुखोई-३० एमकेआय’ची गर्जना...भारतीय हवाई दलाच्या या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या हवाई कसरतींचा थरार शुक्रवारी हजारो शाळकरी मुलांसह पुणेकरांनी अनुभवला. निमित्त होते लोहगाव येथील ‘हवाई दल तळा’वर आयोजित करण्यात आलेल्या ‘आपल्या सेनेला जाणून घ्या’ (नो युवर फोर्सेस) या विशेष कार्यक्रमाचे.

Loading content, please wait...