esakal | Pune : एअर मार्शल चौधरी यांची देखभाल-दुरुस्ती केंद्रास भेट
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : एअर मार्शल चौधरी यांची देखभाल-दुरुस्ती केंद्रास भेट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय हवाई दलाच्या देखभाल दुरुस्ती विभागाचे प्रमुख एअर मार्शल शशीकर चौधरी यांनी पुण्यातील हवाई दलाच्या देखभाल-दुरुस्ती केंद्राला भेट दिली. या वेळी त्यांची पत्नी व एअर फोर्स वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनच्या (एएफडब्ल्यूए- प्रादेशिक) अध्यक्षा अनिता चौधरीदेखील उपस्थित होत्या. पुणे देखभाल दुरुस्ती केंद्राचे एअर कमोडोर के. एस. एस. प्रसाद आणि एएफडब्ल्यूएच्या (स्थानिक) अध्यक्षा के. श्रीलथा यांनी त्यांचे स्वागत केले.

चौधरी यांनी देखभाल दुरुस्ती केंद्रातील विविध कामांचा आढावा घेतला. त्यांना नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय हवाई दलाच्या देखभाल, कार्यान्वयनाची तयारी वाढवण्यासाठी ब्लॉक चेनची क्षमता वापरण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली. पर्यावरणीय पडताळणीच्या व्यापक वापराद्वारे विमान विज्ञानातील जटिल घटकांची दुरुस्ती करणे तसेच ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेअंतर्गत केले जाणाऱ्या कामासाठी या केंद्राचे कौतुक केले.

एअर मार्शल चौधरी यांनी स्वावलंबी होण्यावर भर देत, देखभाल दुरुस्ती केंद्राच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी देशांतर्गत महत्त्वाच्या उपाययोजना शोधण्यासाठी आणि विकसित करण्याच्या दृष्टीने शैक्षणिक संस्था, स्टार्टअप यांच्याशी समन्वय साधत राहण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित केले.

loading image
go to top