

Pune Air Pollution Linked to Bakery Practices
Sakal
पुणे : शहरातील वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असतानाही येथील बहुतांश बेकरी व्यावसायिकांकडून लाकूड, कोळशाचा वापर सुरू आहे. संबंधित बेकरी व्यावसायिकांनी लाकूड, कोळशाऐवजी हरित इंधनाचा वापर पुढील दहा दिवसांत सुरू करावा, अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने बेकरी व्यावसायिकांना दिला आहे.