

Bank Guarantee Mandatory; New Plants Must Be 200m from Schools/Hospitals
Sakal
पुणे : वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांसाठी नवे, अधिक कठोर मार्गदर्शक नियम लागू केले आहेत. या सुधारित मार्गदर्शक सूचनांमुळे धूळकणांचे प्रमाण कमी होऊन वायू प्रदूषणात घट होण्याची अपेक्षा पर्यावरणवाद्यांकडून व्यक्त केली जात आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे ८५ ‘आरएमसी’ प्रकल्प आहेत.