

Pune Airport 15-Minute Pickup Drop Rule | Rs 500 Fine From December 1
esakal
पुणे : पुणे विमानतळावरील वाहनांची गर्दी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणाऱ्या वाहनांना पिकअप-ड्रॉप मार्गिकेत आता केवळ १५ मिनिटे थांबता येणार आहे. या वेळेत प्रवाशांना चढण्या-उतरण्यासाठी पाच मिनिटांचा अवधी समाविष्ट आहे. निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ वाहन थांबल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. वाहनचालकांना नव्या नियमाची माहिती व्हावी, यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असून, १ डिसेंबरपासून नियमाची कठोर अंमलबजावणी होणार आहे.