
पुणे : पुणे विमानतळाच्या विस्तारासाठी आवश्यक असलेली तेरा एकर जागा ऑक्टोबरअखेर विमानतळ प्रशासनाकडे हस्तांतरित होत आहे. या जागेत पाच नवीन पार्किंग बे, रिमोट बे सह कार्गो टर्मिनल करण्याचे विमानतळ प्रशासनाचे नियोजन आहे. यासाठी सुमारे १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.