पुणे विमानतळाला मिळाली १३ एकर जागा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

airport in pune

पुणे विमानतळाला मिळाली १३ एकर जागा

पुणे ः लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी हवाई दलाकडून १३ एकर जागा देण्यास अधिकारी देण्यास तयार नव्हते, पण यावर आता तोडगा काढला आहे. चंदीगड येथे हवाई दलाला जागा देण्यात येणार असून, त्या बदल्यात पुणे विमानतळाला हवाई दलाकडून १३ जागा देण्यात आली आहे. त्यामुळे लोहगाव विमानतळाची क्षमता तीन पटीने वाढणार आहे, असे केंद्रीय केंद्रीय भूपृष्ठ व नौवाहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

पुणे शहर झपाट्याने वाढत असता विमानतळाची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण हे विमानतळ हवाई दलाच्या ताब्यात असल्याने त्यात अडथळे येत आहेत. त्याबद्दल दिल्ली, पुण्यात अनेक बैठका झाल्यानंतर १८ एकर जागा हवाई दलाने भारतीय विमानतळ प्राधिकरणास दिली. गेल्या दोन वर्षापासून विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, माल वाहतुकीसाठी १३ एकर जागेची आवश्‍यकता आहे. त्याबाबत गडकरी यांनी सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात भाष्य केले.

हेही वाचा: दिल्लीला जाण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची बैठक

गडकरी म्हणाले, ‘‘अनिल शिरोळ खासदार असताना त्यांनी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी पाठपुरावा केला. त्यासाठी मी दोनतीन वेळा पुणे आणि दिल्लीत बैठक घेतली. हवाई दलाचे प्रमुख जागा देण्यास तयार नव्हते, पण त्यांना काही झाले तरी तुम्हाला जागा दिलीच पाहिजे, त्यानंतर त्यांनी जागा दिली. आज तेथील विस्तारीकरणाचे काम पूर्णत्वाकडे जात असल्याचे पाहून मला आनंद झाला. पण त्याचवेळी आणखी १३ एकर जागा हवाई दलाने पुणे विमानतळास देणे अपेक्षीत होते, पण त्यांनी दिली नाही. आता पुण्याच्या विमानतळ प्राधिकरणाचे अधिकाऱ्यांची बदली होऊन ते चंडीगडला गेला आहेत. तेथे हवाई दलाला विमानतळासाठी जागा हवी असल्याची मागणी त्यांनी केली. त्यावेळी चंडीगडच्या जागेच्या बदल्यात पुणे विमानतळासाठी जागा दिली जाईल असा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या होत्या. हा प्रस्ताव आता मंजूर झाला आहे.

पंतप्रधानांनी स्थापन केलेल्या पायाभूत सुविधा समितीचा मी अध्यक्ष आहे, या समितीकडे असे सर्व प्रकल्प मंजुरीसाठी येतात. १३एकर जागा पुणे विमानतळाला देण्यात आली असल्याने तेथे विमानतळ विस्तारीकरणाचा प्रस्ताव समितीच्या पुढच्या बैठकीत मान्य करणार आहे. त्यामुळे पुणे विमानतळाची क्षमता तीन पटीने वाढणार आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

Web Title: Pune Airport Got 13 Acres Land Nitin Gadkari

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nitin Gadkaripune airport
go to top