Pune Airport : पुणे विमानतळावर दिवसात २१० विमानांची वाहतूक; नवा विक्रम प्रस्थापित

पुणे विमानतळासाठी रविवारचा (ता. १३) दिवस ऐतिहासिक ठरला.
Pune Airport
Pune Airportsakal
Updated on

पुणे - पुणे विमानतळासाठी रविवारचा (ता. १३) दिवस ऐतिहासिक ठरला. कारण, पुण्याहून १०५ विमानांचे उड्डाण झाले, तर १०५ विमाने धावपट्टीवर उतरली. विमानतळाच्या इतिहासात २१० विमानांची वाहतूक पहिल्यांदाच झाली असून, त्यातून ३३ हजार प्रवाशांनी प्रवास केला. यापूर्वी एका दिवसात २०८ विमानांचा विक्रम झाला होता. आता नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

यंदाच्या उन्हाळी हंगामात हवाईदलाने विमानतळ प्रशासनाला २१८ स्लॉट (विमान उतरण्याची व उड्डाणाची निर्धारित वेळ) उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी २१० स्लॉट विमान कंपन्यांनी आरक्षित केले आहेत. उर्वरित आठ स्लॉट रिकामे आहेत.

दरम्यान, पुणे विमानतळावर रविवारी अतिशय व्यग्रता होती. असे असले तरीही ‘पार्किंग बे’ची समस्या निर्माण झाली नाही. परिणामी एकाही विमानाला गो अराउंड द्यावा लागला नाही, अन्यथा विमानांची संख्या वाढल्यावर ‘पार्किंग बे’ची समस्या जाणवते. परिणामी विमानाला गो अराऊंड द्यावा लागतो. त्याचा फटका प्रवाशांना बसतो.

  • १०५ - विमानांचे उड्डाण

  • १०५ - विमाने धावपट्टीवर

  • ३३ हजार - प्रवाशांचा प्रवास

  • २०८ - यापूर्वीचा विक्रम

पुणे विमानतळाच्या इतिहासात रविवारी सर्वाधिक विमानांची वाहतूक झाली. पुण्याहून वेगवेगळ्या शहरांसाठी सेवा सुरू झाली आहे, तसेच ज्या भागामध्ये प्रवाशांना चांगला प्रतिसाद लाभत आहे, तिथेही विमानांची संख्या वाढली आहे. परिणामी विमानांच्या वाहतुकीत वाढ झाली आहे.

- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com