

goes global! Direct international travel begins as freight volume records a massive 33% increase
Sakal
पुणे : पुणे विमानतळावरून आता थेट आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार आहे. विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) जाहीर केलेल्या हिवाळी वेळापत्रकानुसार, देशांतर्गत ३४ शहरांसह दोन आंतरराष्ट्रीय ठिकाणांपर्यंत उड्डाणांची सोय उपलब्ध झाली आहे. या नव्या बदलांमुळे पश्चिम भारतातील प्रमुख हवाई केंद्र म्हणून पुण्याची ओळख निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे, विमानतळावरील मालवाहतुकीत तब्बल ३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.