
Pune Airport
sakal
पुणे : सीमाशुल्क (कस्टम ड्यूटी) विभागाकडून पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय प्रवाशांना ‘रेड चॅनल’मधून जाण्याची सक्ती केली जात आहे. सीमाशुल्क भरावे लागण्याजोगी एकही वस्तू नसणाऱ्या प्रवाशांनाही ग्रीन चॅनलमधून जाण्यास मज्जाव केला जात असल्याने तपासणीसाठी उशीर होत आहे. याचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय विमानांच्या वेळापत्रकावर होत असून, प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.