Pune Airportsakal
पुणे
Pune Airport: सुविधांमध्ये पुणे विमानतळ आघाडीवर; एसीआय-एएसक्यूचे सर्वेक्षण, चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप
Pune News: पुणे विमानतळाने प्रवासी सुविधांच्या दृष्टीने देशात दुसरे स्थान मिळवले आहे. एएसक्यू सर्वेक्षणात २७ निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत दर्जात लक्षणीय वाढ नोंदवली.
पुणे : विमानतळावर पुरविण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांच्या सर्वेक्षणात पुण्याची क्रमवारी ५९ वरून ५७ झाली आहे, तर देशात चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि कॅनडास्थित एसीआय-एएसक्यू (एअरपोर्ट कॉउंसिल इंटरनॅशनल-एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी) यांनी आपला एप्रिल ते जून २०२५ चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये पुणे विमानतळाचा प्रवासी सुविधांच्या बाबतीतला दर्जा चांगलाच सुधारला आहे.