
पुणे : पुणे विमानतळासाठी मंजूर झालेले १५ स्लॉट लवकरच वापरात येतील. नवीन मार्गांची निश्चिती करण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत मार्गांची निवड होईल. त्यानंतर पुण्याहून विमानांच्या उड्डाणांच्या संख्येत वाढ होणार आहे. विमानांची संख्या वाढल्याने प्रवासासाठी आणखी पर्याय उपलब्ध होणार आहे.