

Pune Airport
Sakal
पुणे - कोणी चेन्नईला जाणारा तर कोणी दिल्लीला, सर्वच प्रवासी आता आनंदले होते. पुणे विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांना गर्दी वा गोंगाटाला तोंड द्यावे लागले नाही. प्रवाशांचा प्रवास आता सुखद अन् सुसह्य झाला. त्याला कारण ठरले पुणे विमानतळावरील अधिकारी आणि ‘सीआयएसएफ’चे जवान.