esakal | पुणे विमानतळावर प्रवाशांच्या सोबतीला आता मदतनीसही !
sakal

बोलून बातमी शोधा

Air transport will continue from Pune airport

पुणे विमानतळावर प्रवाशांच्या सोबतीला आता मदतनीसही !

sakal_logo
By
मंगेश कोळपकर (mangesh.kolapkar@esakal.com)

पुणे : आजींना विमानाने पाठवायचं आहे.... पण सोबत कोणी नाही, ही चिंता आता पुणे विमानतळावर तरी सुटली आहे. कारण विमानतळ प्रशासनाने ‘मिट ॲंड ग्रीट’ योजना सुरू केली आहे. त्यातंर्गत प्रवाशाला आवश्यकता असल्यास मदतनीस उपलब्ध झाला आहे.

ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुलांना सोबत घेऊन प्रवास करणाऱ्या महिला, दिव्यांग प्रवाशांना विमानतळावर अनेकदा मदतीची गरज पडते. बॅग सोबत असताना, बोर्डिंग पास काढणे, संबंधित गेट क्रमांक शोधून विमान सुटण्यापूर्वी तेथेवर पोचणे आदींसाठी त्यांना मार्गदर्शनाची गरज भासते. त्यासाठी विमानतळ प्रशासनाने खासगी संस्थेमार्फत २० मदतनीस उपलब्ध केले आहेत. प्रती प्रवासी सुमारे २०० रुपये शुल्क आकारून हे मदतनीस प्रवाशांना मदत करणार आहेत. विमानतळाच्या आवारात पोचल्यावर प्रवाशांना मदतनीस उपलब्ध होतील, अशी माहिती विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.

सध्या २० मदतनीस असले तरी, प्रवाशांची मागणी वाढल्यास आणखी मदतनीस उपलब्ध करून दिले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. हे मदतनीस सिक्युरिटी चेक इनपर्यंत प्रवाशांना मदत करतील. सुरक्षा तपासणी झाल्यावर संबंधित विमान कंपनीकडून प्रवाशांना मदत उपलब्ध होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

- लोहगाव विमानतळावरून सध्या रोज वाहतूक होणाऱ्या विमानांची संख्या - ४६ ते ५०

- प्रवाशांची रोजची ये-जा - सुमारे १२ हजार

- लोहगाववरून विमानसेवा - २५ शहरांशी

loading image
go to top