Pune Airport : प्रवाशांची वाट पाहण्यासाठी टर्मिनलवर थांबणाऱ्या वाहनांवर विमानतळ प्रशासनाची नजर; एनपीआर कॅमेऱ्यांद्वारे वेळेची नोंद होणार

Pune Airport 15 Minute Vehicle Waiting Rule : पुणे विमानतळाच्या टर्मिनलवर डिसेंबरपासून वाहनांसाठी ड्वेल टाइम नियम लागू होणार असून पंधरा मिनिटांपेक्षा अधिक थांबल्यास वाहनचालकांना पाचशे रुपयांचा दंड भरावा लागेल.
Pune Airport15 Minute Vehicle Waiting Rule

Pune Airport15 Minute Vehicle Waiting Rule

sakal

Updated on: 

विमानतळाच्या टर्मिनलवर वाहनांचा थांबा ‘महागात’ ; १५ मिनिटांपेक्षा अधिक थांबल्यास ५०० रुपये दंड

पुणे, ता. १६ : पुणे विमानतळाच्या टर्मिनलमध्ये वाहनचालकांना प्रवाशांची वाट पहात थांबणे आता महागात पडणार आहे. कारण येत्या डिसेंबरपासून विमानतळ प्रशासनाकडून ‘ड्वेल टाइम’ची (थांब्याचा कालावधी) अंमलबजावणी केली जाणार आहे. यात १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास संबंधित वाहनचालकाला ५०० रुपयांचा दंड होईल. यासाठी टर्मिनलमध्ये एनपीआर (नंबरप्लेट रेकग्निशन) कॅमेरे बसविले असून दोन मोठे स्क्रीनही लावले जात आहेत. १५ मिनिटांच्या आत वाहन काढले तर कोणतीही कारवाई होणार नाही, मात्र १५ मिनिटांनंतर त्या वाहनाला ५०० रुपयांचा दंड होईल.

Loading content, please wait...