
पुणे : विमानतळाभोवतीच्या कचरा प्रश्नावर ‘सकाळ’ने आवाज उठविल्यानंतर अखेर महापालिका प्रशासनाला जाग आली आहे. विमानतळ परिसरात कचरा टाकला जाणार नाही, यादृष्टीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये घरोघरी कचरा संकलन, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, तीन पाळ्यांमध्ये कचरा उचलण्याची व्यवस्था अशा ठोस उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली आहेत. तसेच विशेष नोडल अधिकाऱ्याच्या नियुक्तीसह सफाई सेवकांच्या विशेष पथकाची स्थापन केली आहे.