पुणे : 'सर्वधर्म समभाव' व राष्ट्रीय एकात्मतेचे घडले दर्शन

मुस्लिम बांधवांसाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने रोजा इफ्तार
Muslim festival roja iftar
Muslim festival roja iftar sakal

मुंढवा : केशवनगर, मुंढवा, घोरपडी व कोरेगाव पार्क परिसरातील मुस्लिम बांधवांसाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कामगार सेलच्या वतीने रोजा इफ्तार, नमाज अदा व मुस्लीम बांधवांच्या हस्ते गणेश आरती चा कामगार मैदानातील गणेश व संत रोहिदास महाराज यांच्या मंदिरीच्या आवारात, हा कार्यक्रम एकत्रित घेण्यात आला. त्यातून सर्वधर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन या ठिकाणी पहायला मिळाले.

इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष व सरचिटणीस सोमनाथ शिंदे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी पी.ए. इनामदार यांच्या हस्ते, श्री गणेशाची आरती करुन करण्यात आली. यावेळी जय श्रीराम या घोषणेबरोबरच अल्लाहू अकबर च्या एकत्रीत घोषणा देण्यात आल्या. रोजा सोडतेवेळी हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्रित रोजा सोडून याच ठिकाणी मुस्लिम समाजाने नमाज अदा करून, आम्ही सर्वजण एक असल्याची खात्री दिली.

या प्रसंगी माजी नगरसेविका पुजा कोद्रे, ऍड. इकबाल शेख, फहीम शेख, आसीम सरोदे, सलीम मेमन, युनूस शेख, राजू अग्रवाल, संदीप कोद्रे, नूरखान, समीर कोद्रे, सागर भंडारी, कालिदास गायकवाड, संजय शिंदे, सुनिल जगताप, बाबा घोलप, राजू शिंदे यांनी सहभाग घेतला होता.

शिक्षण महर्षी इनामदार म्हणाले सर्व-धर्मीय कार्यक्रम घेणे समाजासाठी आवश्यक आहे. ऍड. सरोदे म्हणाले, सध्या समाजामध्ये धर्मा-धर्मा मध्ये विष पेरण्याचे काम करणार्‍यांना दूर करण्याचे काम सर्वांनी एकत्र मिळून केले पाहिजे. संजय कांबळे म्हणाले हे राज्य संविधान आणि घटनेनुसार चालेल. कोणाच्या फतव्यानुसार चालणार नाही.

अल्पसंख्यांक सेलचे माजी अध्यक्ष इक्बाल शेख यांनी हिंदू समाजाने मुस्लिम समुदाय साठी केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक केले.सर्वधर्म समभाव व धर्मनिरपेक्षतेचे येथे दर्शन घडले अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आयोजक शिंदे म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत सांप्रदायिक वातावरण बिघडण्याचे काम काही समाज विघातक शक्ती करीत आहेत जाती-जातीत धर्मा-धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम काहींनी हाती घेतले असताना, समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून आपण सर्वांनी यांना कडाडून विरोध करण्यासाठी आणि जातीय सलोखा, बंधुभाव निर्माण करण्यासाठी मंदिराच्या प्रांगणात नमाज व आरतीचा कार्यक्रम घेऊन, हम सब एक है चा नारा बुलंद केला.

केशवनगर येथील मज्जीद मध्ये रोजा इफ्तार हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला माजी आमदार महादेव बाबर, परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, विक्रम लोणकर, सोमनाथ गायकवाड, विजय दरेकर, दादा कोद्रे, रमेश राऊत, आक्रम खान, नुरखान व ग्रामस्थ व मुस्लीम बांधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com