

पुणे : मंगळवार पेठेतील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) भूखंडावरील आरक्षण कायम ठेवून त्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर गरीब विद्यार्थी वसतिगृह, लोकोपयोगी उपक्रम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा विस्तार करण्याच्या प्रस्तावाला पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने आज मंजुरी दिली. या कामासाठी राज्य शासनाकडे २५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.