Pune : आंबेगाव शेतकऱ्यांकडून हायटेक ड्रोन द्वारे फवारणी

औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर केल्याने वेळेची व पैशाची मोठी बचत
Pune Ambegaon farmer hi tech drone spraying crop protection
Pune Ambegaon farmer hi tech drone spraying crop protection

पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकरी हायटेक बनले असून आधुनिक तंत्रज्ञानाची ते कास धरू लागले आहे. पोंदेवाडी गावातील युवा शेतकरी नाथा रामदास वाळुंज यांनी त्यांच्या शेतातील पाच एकर क्षेत्रातील मका पिकावर औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर केल्याने वेळेची व पैशाची मोठी बचत झाली आहे. गावात ड्रोनद्वारे प्रथमच फवारणी होत असल्याने हा प्रयोग पाहण्यासाठी बहुसंख्येने ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

पोंदेवाडी गावाच्या परिसरातून जात असलेल्या डिंभा उजव्या कालव्यामुळे बहुतांशी शेती बागायती झाली आहे वर्षभर शेतीला पाणी उपलब्ध होत असल्याने शेतकरी शेतात विविध प्रकारची पिके घेतात नाथा रामदास वाळुंज यांनीही पाच एकर क्षेत्रात स्वीट कॉर्न मका पिकाची लागवड केली आहे मकेच्या पिकाची पाच ते सहा फुट वाढ झाली आहे.

पिकाला अळीचा प्रादुर्भाव झाल्याने औषधाची फवारणी करणे गरजेचे होते नेहमीच्या पाठीवरील पंपाने फवारणी करायची झाली असती तर उंच वाढलेल्या पिकामुळे सर्व पिकांना व्यवस्थित फवारणी करता आली नसती पाच एकर साठी संपूर्ण दिवस लागला असता या करिता नाथा रामदास वाळुंज यांनी ८०० रुपये प्रती एकर याप्रमाणे ड्रोन भाड्याने आणून फवारणी केली संपूर्ण पाच एकर च्या फवारणीसाठी श्री. वाळूंज यांना अवघा अर्धा तास लागला.

ड्रोनच्या टाकीत एकावेळी १० लिटर औषध बसते १३ फुट रुंदीचे क्षेत्र एकावेळी फवारले जाते ज्या ठिकाणी औषध संपले आहे त्याच ठिकाणावरून पुन्हा टाकीत औषध भरल्यानंतर ड्रोन पुन्हा फवारणीला सुरुवात करतो असे श्री. वाळूंज यांनी सांगितले ड्रोन द्वारे फवारणी केल्यामुळे औषध कमी लागते त्यामुळे पैशाची व वेळेची बचत झाली आहे.

पोंदेवाडी ता. आंबेगाव: पोंदेवाडी गावातील युवा शेतकरी नाथा रामदास वाळुंज यांनी त्यांच्या शेतातील पाच एकर क्षेत्रातील मका पिकावर औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर केल्याने वेळेची व पैशाची मोठी बचत झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com