Pune Crime : पुण्यात सराईत गुन्हेगाराला बेड्या; आंबेगावातून 'गावठी पिस्तूल' अन् काडतुसे जप्त
Illegal weapon arrest Pune : पुण्यातील आंबेगाव पोलिसांनी नऱ्हे येथील सुयश घोडके या सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून ४१ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पुणे : आंबेगाव पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या प्रकरणी आरोपीविरुद्ध आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.