

मंचर, ता. २ : आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी पुणे जिल्हा परिषद एकात्मिक पाणी व्यवस्थापन कार्यक्रम सन २०२६-२७ अंतर्गत ९४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निधी मंजूर झाल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी दिली.
कामाचे नाव व कंसात मंजूर रक्कम- डिंभे खुर्द येथे सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीला आडवे बोअर घेणे (३.५० लाख), चपटेवाडी येथे सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरीवर सौरपंप बसविणे (४.५० लाख), डिंभे बुद्रुक येथे वॉटर एटीएम मशीन बसविणे (४.५० लाख), तिरपाड आंबवणे वस्ती येथे सार्वजनिक पाणीपुरवठा विहीर बांधकाम (३ लाख), शिनोली येथे पिण्याच्या पाण्याची टाकी बांधणे (३ लाख), लाखणगाव येथे सार्वजनिक विहिरीपासून प्राथमिक आरोग्य उपकेंद्रापर्यंत पाणी वितरण व्यवस्था (३ लाख).
निरगुडसर दशक्रिया घाट येथे २५ हजार लिटर क्षमतेची उंच पाण्याची टाकी बांधणे (१३ लाख), निरगुडसर बेलसरवाडी येथील टेमकर-टाव्हरेवस्ती येथे गटारकाम (६ लाख), धामणी पंचरासवस्ती येथे पाणी वितरण व्यवस्था (७ लाख), शिंगवे शेरीमळा येथे गटारकाम (५ लाख), एकलहरे शिंदेवाडी येथे गटारकाम (५ लाख), अवसरी बुद्रुक खालचा शिवार येथे गटारकाम (९ लाख), अवसरी बुद्रुक येथील यशोदिप मंगल कार्यालय ते प्रजिमा १३ शिरूर रस्ता येथे गटारकाम (९ लाख).
वाळुंजवाडी येथे आरओ प्लांट बसविणे (२.५० लाख), पारगाव तर्फे खेड येथील गंगेवाडी येथे आरओ प्लांट बसविणे (२.५० लाख), केंदूर (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळा पाचवडवस्ती येथे पाणी वितरण व्यवस्था (८ लाख), बाभुळसर खुर्द (ता. शिरूर) येथे गावठाण वेशीजवळ गटारकाम (५ लाख).
ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्याच्या अडचणी दूर करण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या कामांना प्राधान्याने मंजुरी देण्यात आली आहे. मंजूर निधीचा योग्य वापर करून सर्व कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करून घ्यावीत, असे आवाहन विवेक वळसे पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.