Ambulance forced to offload patient in the middle of the intersection due to immersion chariot.
sakal
पुणे - गणपती मंडळाचा रथ पूना हॉस्पिटलच्या गल्लीत अडकल्याने संपूर्ण रस्ता बंद झाला. त्याच वेळी तेथे एक रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन आली. या रुग्णवाहिकेला पुढे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अखेर स्ट्रेचर रस्त्याने ढकलत रुग्णालयात दाखल करण्याची नामुष्की ओढावली. त्यामुळे किमान रुग्णालयांकडे जाणारे तरी रस्ते मोकळे ठेवणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.