

'Amrutanubhav' Program on December 5th
Sakal
पुणे : संतसाहित्य व तत्त्वज्ञान यांची रोजच्या अनुभवांशी सांगड घालून गीत सादरीकरण आणि निरूपण स्वरूपात सादर करणारा अनोखा कार्यक्रम म्हणजे ‘अमृतानुभव’. संतसाहित्यातील ज्ञानामृताचा अनुभव घेण्याची संधी या कार्यक्रमातून रसिकांना मिळणार आहे.
निमित्त आहे, ‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ या महोत्सवाचे. या महोत्सवांतर्गत ५ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ‘अमृतानुभव’ या अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त ही कलाकृती सादर केली जाणार आहे. ‘सुहाना मसाले’ हे या महोत्सवाचे मुख्य प्रायोजक असून विश्वकर्मा विद्यापीठ हे सहप्रायोजक आणि भारती विद्यापीठ हे सहयोगी प्रायोजक आहेत.