esakal | Pune : सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना लाच घेताना पकडले
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना लाच घेताना पकडले

Pune : सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना लाच घेताना पकडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : फसवणूकीच्या गुन्ह्यात जामिनासाठी मदत करण्यासाठी एकाकडून पाच लाखांची लाच मागणाऱ्या विमानतळ पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षकासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी पकडले. एक लाख रुपये स्वीकारता ही कारवाई करण्यात आली.

सहायक पोलीस निरीक्षक राहुल पाटील आणि संतोष भाऊराव खांदवे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. तक्रारदाराच्या वडिलांविरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात तक्रारदाराने वडिलांना जामीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. जामिनास विरोध न करणे तसेच अनुकुल अभिप्रायासाठी पाटील यांनी तक्रारदाराकडे पाच लाखांची लाच मागितली होती. तडजोडीत तक्रारदाराने तीन लाखांची लाच देण्याचे मान्य केले. लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाखांची मागणी करण्यात आली होती.

 पाटील यांनी त्यांचा ओळखीचे खांदवे याला तक्रारदाराकडून लाच घेण्यासाठी लोहगाव परिसरात पाठविले. दरम्यान, या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून खांदवेला एक लाखांची लाच घेताना पकडले. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

loading image
go to top