

pune Anti-Loudspeaker Forum, Noise Pollution
esakal
पुणे: पुण्यातील गणेश उत्सव पूर्वतयारीच्या सभेमधून विद्यानंद बापट यांना बाहेर काढल्यानंतर आणि सप्टेंबर मध्ये त्यांना मारहाण केली गेल्यामुळे सामान्य पुणेकराला धक्का बसला.
मध्यमवर्गीय जेष्ठ नागरिकांना आपला आवाज असा दडपशाहीने दाबला जाणार असेल तर त्या विरोधात उतरायला पाहिजे ही भावना तयार झाली आणि त्यातूनच लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंच नावाने लोक एकत्र आले
पुणेकरांच्या पुढाकाराने प्रथम कलाकारकट्टा डेक्कन जिमखाना येथे आंदोलन आणि स्वारगेट येथे मोर्चा काढण्यात आला. विविध मागण्यांबाबत पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आणि त्यानंतर लाऊडस्पीकरविरोधी पुणेकर मंचाच्या पुढाकाराने बालगंधर्व /झाशीची राणी पुतळा चौक ते पुणे महानगरपालिका असा मोठा मोर्चा काढण्यात आला.