
मार्केट यार्ड : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजाची सखोल चौकशी होईल. त्यासाठी ५१ गंभीर मुद्दे काढण्यात आले. त्यानुसार तपासणी करण्याचा आदेश पणन संचालकांनी दिला. निविदा टेंडर प्रक्रिया, करार, खरेदी-विक्री व्यवहार, प्रशासकीय निर्णय, बांधकामे, इंधन पंप व्यवहार, भाडेकरार आदी प्रमुख मुद्दे आहेत. संचालक कार्यालयाने चौकशीसाठी विशेष समिती नियुक्त केली आहे. ही समिती एक एप्रिल २०२३ ते सात जुलै २०२५ या कालावधीतील कागदपत्रांची तपासणी करून अहवाल सादर करणार आहे.