esakal | Pune : मालवाहू विमान खरेदीला मंजुरी
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : मालवाहू विमान खरेदीला मंजुरी

Pune : मालवाहू विमान खरेदीला मंजुरी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : सुरक्षा विषयक केंद्रीय समितीने स्पेनच्या ‘मेसर्स एअरबस डिफेन्स आणि स्पेस एस ए’कडून भारतीय हवाई दलासाठी सी-२९५ एमडब्ल्यू मालवाहू विमाने खरेदी करण्यासाठी संरक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. यात एकूण ५६ सी-२९५ एमडब्ल्यू विमाने हवाई दलासाठी घेण्यात येणार आहेत. यासाठी स्पेनमधून उड्डाणास तयार स्थितीतील १६ विमाने आणि ४० विमानांची निर्मिती भारतातच केली जाणार आहे.

स्वदेशी क्षमता बळकट करण्यासाठी आणि ‘मेक इन इंडिया’ या उपक्रमांतर्गत हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. यात करारावर स्वाक्षरी केल्यापासून ४८ महिन्यांच्या आत स्पेनमधून सोळा विमाने उड्डाणक्षम स्थितीत पाठवली जातील. तसेच दहा वर्षांत टाटा कन्सोर्टियमद्वारे चाळीस विमानांची भारतातच निर्मिती केली जाणार आहे. सर्व ५६ विमानांमध्ये स्वदेशी ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सूट’ बसविण्यात येणार आहेत. हा प्रकल्प भारतातील एरोस्पेस परिसंस्थेला चालना देईल, त्यामुळे देशभरातील अनेक सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) उद्योग हे विमानाच्या सुट्या भागांच्या निर्मितीमध्ये सहभागी होतील.

रोजगाराची संधी

  1. एरोस्पस क्षेत्रात विमानांच्या छोट्या-मोठ्या भागांची निर्मिती

  2. एरोस्पेस परिसंस्थेत रोजगारनिर्मितीत मैलाचा दगड

  3. हवाई आणि संरक्षण क्षेत्रात ६०० कुशल नोकऱ्यांची संधी

  4. तीन हजारांपेक्षा अधिक अप्रत्यक्ष रोजगार

  5. तीन हजार मध्यम कुशलतेचे रोजगार

सी-२९५ एमडब्ल्यूची वैशिष्ट्ये

  1. पाच ते दहा टन क्षमतेची वाहतूक करणारे मालवाहू विमान

  2. समकालीन तंत्रज्ञानाने सुसज्ज

  3. हे मालवाहू विमान जुन्या ‘एवरो’ विमानांची जागा घेईल

  4. विमानाला मागच्या बाजूला जलद प्रतिसादासाठी आणि सैन्य व वस्तू पॅराशूटद्वारे सोडण्यासाठी दरवाजा

loading image
go to top