

ATS Arrest: Condhwa IT Engineer
Sakal
पुणे : कोंढव्यात काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या कारवाईत अटक केलेल्या जुबेर हंगरगेकरकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांत बॉम्ब बनविण्याची सविस्तर कृती सापडल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता तपास यंत्रणांनी चौकशी अधिक कडक केली असून, जुबेरच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी विविध तांत्रिक पुरावे आता तपासले जात आहेत.