
पोलिस दलामध्ये 32 वर्ष केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल सरकारने राष्ट्रपतींचे पदक देऊन सन्मान केला. हा सन्मान माझ्या कुटुंबासह संपुर्ण पोलिस दलाचा आहे. माझ्या आयुष्यातील आनंदाचा सर्वोच्च क्षण आहे.
- प्रदीप जांभळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, एटीएस, पुणे युनीट
एटीएसच्या पुण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला राष्ट्रपती पदक
पुणे : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे युनीटमधील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप हरिश्चंदद्र जांभळे यांना पोलिस दलामध्ये उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाले आहे. गुन्हेगारी टोळ्यांवर वचक बसविण्याबरोबरच पाकिस्तानला माहिती पुरविणाऱ्यांना पकडून देण्याची महत्वपुर्ण कामगिरी जांभळे यांनी केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
केंद्र सरकारने शनिवारी दुपारी राष्ट्रपती पदक प्राप्त पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे जाहीर केली. त्यामध्ये पोलिस दलामध्ये उल्लेखनिय सेवा बजावल्याबद्दल दिले जाणारे राष्ट्रपती पदकामध्ये जांभळे यांचे नाव जाहीर करण्यात आले. जांभळे यांनी आपल्या 32 वर्षांच्या सेवेमध्ये बहुतांश सेवा पुणे पोलिस दलामध्ये बजावली आहे. त्यांनी शहरातील कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्यांच्या प्रमुखांसह अनेकांना अटक करण्यामध्ये महत्वाची भुमिका बजावली होती. याबरोबरच अपहरण, वाहनचोरीच्या प्रकरणांचा शोध घेऊन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांनी 52 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले होते.
पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, जांभळे यांची "एटीएस'च्या पुणे युनीटमध्ये बदली झाल्यानंतरही त्यांनी आपली सेवा बजावण्यास प्राधान्य दिले. शहरातील अतिमहत्वच्या ठिकाणांची पाकीस्तानला माहिती देणाऱ्या दोघांना पकडून देण्याचीही महत्वाची कामगिरी केली होती. याबरोबरच बांग्लादेशी घुसकोरांना शोधण्यामध्येही जांभळे यांनी महत्वाचे काम केले. जांभळे यांना आत्तापर्यंत 328 रिवॉर्डस् व 93 हजार रुपयांचे बक्षिस मिळविले आहे. त्यांच्याकडून एकदाही चुकीचे काम झाले नसल्याची माहिती "एटीएस'चे सहाय्यक पोलिस आयुक्त विक्रम देशमाने यांनी दिली.
पोलिस दलामध्ये 32 वर्ष केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल सरकारने राष्ट्रपतींचे पदक देऊन सन्मान केला. हा सन्मान माझ्या कुटुंबासह संपुर्ण पोलिस दलाचा आहे. माझ्या आयुष्यातील आनंदाचा सर्वोच्च क्षण आहे.
- प्रदीप जांभळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, एटीएस, पुणे युनीट