Pune :...आणि महाविद्यालय पुन्हा गजबजले

महाविद्यालय दोन वर्षांनी सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता
pune colleges reopen
pune colleges reopen sakal media

औंध : गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे सगळेच धास्तावलेले,वर्ग, महाविद्यालये ओस पडलेली. परंतु त्यावर मात करून आज पुन्हा औंध येथील रयत शिक्षण संस्थेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने गजबजले.

pune colleges reopen
Drugs Case: शाहरुखला झटका; आर्यनचा जामीन फेटाळला

सकाळी साडेसात वाजल्यापासूनच विद्यार्थ्यांची पाऊले महाविद्यालयाच्या आवारात वळू लागली होती. विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे व इतर सर्व प्राध्यापक महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर उभे होते. महाविद्यालय दोन वर्षांनी सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. याप्रसंगी सर्वांना गुलाब पुष्प व मास्कचे वाटप करून उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

pune colleges reopen
बेस्ट लक भाऊ; धोनीसमोर विराटनं दिली रोहितकडे कॅप्टन्सी

तसेच कोरोना संपला नसून त्यासंबंधीची काळजी घेण्याच्या सूचनाही प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना यावेळी केल्या. या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. संजय नगरकर, प्रा.बी.एस पाटील, डॉ.बंडोपंत कांबळे, डॉ.राजेंद्र रासकर,डॉ.रमेश रणदिवे, डॉ.रेश्मा दिवेकर, प्रा.मयूर माळी इ. उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com