पुणे - पुण्याच्या ग्रामीण आणि शहरी भागात अजूनही बालविवाहाच्या घटना घडत असल्याचे महिला व बालकल्याण विभागाकडून रोखण्यात आलेल्या बालविवाहांनी पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या नोव्हेंबर महिन्यात १२ बालविवाह रोखण्यात आले, तर ऑक्टोबरमध्ये तीन असे होत असलेले १५ बालविवाह वेळीच रोखण्यात आले. यापैकी काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.