

Auto Rickshaw Drivers Protest in pune
पुणे : शहरातील ‘बाईक टॅक्सी’ धोरण रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता. २३) सकाळी ११ वाजता परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष नितीन पवार यांनी दिली.