Pune Rain Waiting
sakal
पुणे - जुलैच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावल्यानंतर पावसाने शहरात पुन्हा विश्रांती घेतली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने आणि तापमानात वाढ झाल्यामुळे पुणेकर उकाड्याने हैराण झाले आहेत. दरम्यान पुढील पाच दिवस शहर आणि परिसरात पावसाची कोणतीही शक्यता नसल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे पुणेकरांची पावसाची प्रतीक्षा आणखी लांबणीवर पडली आहे.