गुरुवारपासून पुणे-बारामती व बारामती-दौंड रेल्वे सेवा होणार सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Railway
गुरुवारपासून पुणे-बारामती व बारामती-दौंड रेल्वे सेवा होणार सुरु

गुरुवारपासून पुणे-बारामती व बारामती-दौंड रेल्वे सेवा होणार सुरु

बारामती - जवळपास दोन वर्षांपासून कोविडमुळे (Covid) बंद पडलेली रेल्वेसेवा (Railway Service) पुन्हा अंशतः सुरु करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. गुरुवारपासून (Thursday) (ता. 27) पुणे ते बारामती व बारामती ते दौंड अशा दोन फे-या केल्या जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या प्रसिध्दीपत्रकात देण्यात आली आहे.

वास्तविक बारामती पुणे अशी रेल्वे सेवा सुरु करण्याची बारामतीकरांची मागणी होती, प्रत्यक्षात ही मागणी पूर्णच झालेली नसून सध्या तरी अंशतः रेल्वे सेवा सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

गुरुवारपासून सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावरुन दहा डब्यांची डेमू रेल्वे सुटेल. ती पावणेनऊ वाजता दौंड रेल्वे स्थानकावर येईल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन ती मळदगाव, शिरसाई, कटफळ मार्गे बारामतीत सव्वा दहा वाजता दाखल होईल. हीच गाडी तीन तासांचा थांबा बारामतीत घेऊन पुन्हा दुपारी सव्वा एक वाजता दौंडकडे रवाना होईल. दौंडला ही गाडी दुपारी दोन वाजून 35 मिनिटांनी पोहोचणार आहे.

हेही वाचा: आजारी मालकाला ड्रायव्हरने घातला ५१ लाखांना गंडा

रेल्वेने प्रवास करायचा असल्यास तिकीट काढताना लसीचे दोन्ही डोस घेतल्याचा युनिर्व्हसल पास दाखवावा लागणार आहे, 18 वर्षांखालील मुलांना वयाचा दाखला दाखवावा लागणार आहे. दरम्यान रेल्वेने ही सेवा सुरु करण्यासाठी पूर्ण तयारी केल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

बारामतीकरांची गैरसोय कायमच राहणार...

रेल्वेने बारामतीहून पुण्याला जाण्यासाठी सकाळी व दुपारची गाडी पुन्हा पूर्ववत सुरु करावी अशी बारामतीकरांची मागणी होती. प्रत्यक्षात पुण्याहून बारामतीला येण्याची सोय झाली पण बारामतीहून पुण्याला जाण्याची सोयच झाली नाही अशी भूमिका बारामतीकरांनी मांडली.

Web Title: Pune Baramati And Baramati Daund Railway Start From Thursday

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..