esakal
पुणे : बारामतीमधील काळखैरेवाडी परिसरात आढळलेल्या अनोळखी महिलेच्या खुनाचा व त्याच प्रकरणात एकतर्फी प्रेमातून (One Sided love Crime) घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी (Pune Crime News) पर्दाफाश केला. या प्रकरणात आतापर्यंत पाच खून केलेल्या सराईत गुन्हेगाराला अटक झाली असून, स्थानिक गुन्हे शाखा व सुपा पोलिस ठाण्याच्या संयुक्त पथकाने कारवाई केली.