Pune : बारामतीत आता चतुर्थी रनची अभिनव संकल्पना...

अपार श्रध्दा व भक्ती यांचा संगम साधत अनेकांनी अत्यंत लीलया हे अंतर पार केले
डॉ.चंद्रकांत हाके
डॉ.चंद्रकांत हाकेsakal
Updated on

बारामती : संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधत बारामतीतील 50 जणांनी बारामती ते मोरगावचे मयुरेश्वर मंदीर हे 33 कि.मी.चे अंतर धावत पूर्ण केले. येथील गावडे हॉस्पिटलचे डॉ. पांडुरंग गावडे यांच्या नेतृत्वाखाली महिला व पुरुषांनी एकत्र येत भल्या पहाटे चार वाजता बारामतीतून या उपक्रमास प्रारंभ केला.

अपार श्रध्दा व भक्ती यांचा संगम साधत अनेकांनी अत्यंत लीलया हे अंतर पार केले. यात महिलांचाही उत्साह मोठा होता. या पुढील काळात प्रत्येक चतुर्थीला हा उपक्रम राबविण्याचा निर्णय झाला. शारिरीक क्षमता वाढविणे व व्यायामाचे सातत्य कायम टिकविणे असा या मागचा उद्देश असल्याचे डॉ. पांडुरंग गावडे यांनी नमूद केले.

डॉ.चंद्रकांत हाके यांनी नाष्टाची सोय केली. तसेच मेडद येथील गणेश काशीद, प्रक्षिक कांबळे, नेपतवळण येथील शिवकृपा हॉटेलचे नितीन मुलमुले व जळगाव येथील डॉ.अतुल पिसाळ व अशोक कोकणे, लोणी भापकर येथील स्वच्छता अभियान ग्रुप व डॉ.संजय पाटील(उपाध्ये), तरडोली येथील मंगेश खताळ,गणेश कांबळे, आप्पा पाटील व दिलीप खैरे, पोपट तावरे, नीलेश केदारी यांनी स्वागत व इतर सहकार्य केले. अनिल रूपनवरयांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakal Impact
Sunetra Pawar Brings Big Gift for Baramati Announces Development Projects and Emotional Tribute to Ajit Pawar
Sunetra Pawar Ensures Immediate Medical Aid for Injured Woman in Baramati
Deputy Chief Minister Sunetra Pawar, MP Parth Pawar and Jay Pawar paid floral tributes at Ajitdada Pawar's memorial sites.
Marathi News Esakal
www.esakal.com