Pune : वर्ष उलटूनही बारामती नगरपालिकेची निवडणूक नाहीच

प्रशासकांना वर्षाचा कालावधी पूर्ण
Baramati Municipality is facing the economic crisis due to the corona
Baramati Municipality is facing the economic crisis due to the corona sakal

बारामती : नगरपालिकेची मुदत संपून आता एक वर्षांचा कालावधी उलटून गेल्यावरही अजूनही नगरपालिका निवडणूकांबाबत संदिग्धताच असल्याने लोकप्रतिनिधींचा कारभार नेमका केव्हा सुरु होणार या बाबत बारामतीकरांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

बारामती नगरपालिकेची निवडणूक डिसेंबर 2016 मध्ये झाली. नवीन नगरसेवकांनी फेब्रुवारी 2017 मध्ये पदभार स्विकारला. या सदस्यांची मुदत फेब्रुवारी 2022 मध्ये संपुष्टात आली. त्या नंतर मुख्याधिका-यांना राज्य शासनाने निवडणूक होऊन नवीन सदस्य येईपर्यंत प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

निवडणूका होतील असे वाटत असताना अनेकदा विविध कारणांमुळे राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या गेल्या. तब्बल वर्षभर बारामतीत मुख्याधिकारीच प्रशासक म्हणून नगरपरिषदेचा कारभार पाहत आहेत. वास्तविक अनेकांना नगरपालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहण्याची इच्छा आहे, पण निवडणूकीची चिन्हेच नसल्याने इच्छुकही आता शांत बसलेले चित्र दिसत आहे.

बारामती नगरपालिकेत राष्ट्रवादीचे वर्चस्व असते, विरोधी पक्षनेते अजित पवार दरवर्षी काही नवीन तर काही जुने चेहरे असे समीकरण जुळवत असतात, त्या मुळे जुन्या नगरसेवकांना पुन्हा संधी हवी आहे तर काही नवीन कार्यकर्त्यांनाही नगरसेवक म्हणून काम करण्याची इच्छा आहे. काही जण आपल्याला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी द्यावी अशा आशा लावून बसलेले आहेत.

होणार होणार म्हणून प्रतिक्षेत असलेल्या अनेक इच्छुकांच्या अपेक्षांवर निवडणूकीच्या विलंबाने पाणी फिरविले आहे. अनेक ठिकाणी निर्णय प्रक्रीया राबविताना मुख्याधिकारीही काळजीपूर्वक निर्णय घेत असल्याने त्याचाही काहीसा परिणाम निर्णयप्रक्रीयेवरही होताना दिसत आहे.

नगरपालिकांच्या बैठकांमधून होणा-या चर्चा, नागरिकांचे मांडले जाणारे प्रश्न, विकासकामे वेळेत पूर्ण होण्यासाठी भांडणारे नगरसेवक,अनेकदा प्रशासनाला विविध कारणांवरुन धारेवर धरणारे अभ्यासू नगरसेवक व त्यांच्या अभ्यासपूर्ण चर्चा असे चित्र गेल्या वर्षभरात पाहायलाच मिळाले नाही.

मिलिंद संगई, बारामती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com