शिवशाही बरोबर साध्या गाड्याही सोडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

बारामती : एसटीने प्रवास करुन पुण्याला जाणे दिवसेंदिवस दिव्य बनत असून बारामती बसस्थानकावरील तिकीटासाठीची रांग कमी करण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. 
बारामती-पुणे-बारामती या मार्गावर दररोज जवळपास 45 हून अधिक गाड्या धावतात. मात्र, वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर या गाड्याही अपुऱ्या पडत असल्याचे चित्र आहे. बारामती व स्वारगेट दोन्ही बसस्थानकांवर दिवसभरात कधीही गेल्यास तिकीटासाठी प्रवाशांच्या लागलेल्या रांगा हे चित्र नवीन नाही. 

गर्दीच्या वेळेस प्रवाशांची होणारी अधिकची गर्दी विचारात घेता गर्दीच्या वेळेस अधिक गाड्यांचे नियोजन करणे गरजेचे आहे. अनेकदा ज्येष्ठ नागरिकांनाही तास तास रांगांत थांबल्याशिवाय तिकीट मिळत नाही असा अनुभव आहे. या मार्गावर एसटीला सर्वाधिक उत्पन्न मिळत असूनही एसटी प्रशासन या मार्गावर गाड्या वाढविण्यास तयार नाही. 
बारामती पुणे बारामती मार्गावर शिवशाहीच्या बसेस सुरु केल्यानंतर साध्या गाड्या त्या मार्गावरुन काढून घेण्यात आल्या, वास्तविक साध्या गाड्याही या मार्गावर ठेवून अतिरिक्त शिवशाहीच्या बसेस दिल्या असत्या तर रांगेचा प्रश्न निर्माण झाला नसता.

एकीकडे प्रवाशांची रांग लागत असतानाही केवळ एकच वाहक तिकीटे देण्यासाठी दिला जातो, त्या मुळे तिकीट वाटपासाठीचा वेळही अधिक जातो. दोन रांगा करुन दोन वाहकांकरवी गर्दीच्या वेळेस तिकीटे देण्याची व्यवस्था केली तर लोकांचा महत्वाचा वेळ वाचू शकेल. या बाबत प्रवाशांच्या वारंवार तक्रारी येऊनही एसटी प्रशासन मात्र काहीही करायला तयार नाही, असे प्रवाशांनीच सांगितले. 

Web Title: Pune to Baramati provide ST bus with Shivshahi