Ajit Pawar
sakal
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निधनाने पुणे शहरासह जिल्ह्याचा ‘पालक’ गेला. स्पष्टवक्तेपणा, कामाचा प्रचंड झपाटा आणि प्रशासनावर पकड असणाऱ्या दादांना पुण्याच्या राजकारणात मानणारा एक मोठा वर्ग होता. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराबरोबर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. एका अर्थाने पुणे जिल्हा राजकारणातील ‘दादा’ माणसाला मुकला आहे.