Pune-Beed Railway : मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र जोडणारी पुणे-बीड रेल्वे धावली; 22 सप्टेंबरपासून नियमित प्रवास सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक आणि थांबे!

Pune-Beed Railway Regular Service From September 22 : पुणे-बीड रेल्वेची नियमित सेवा २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. बीडहून परतीची सेवा २३ सप्टेंबरपासून सुरू होईल. नव्या रेल्वेमुळे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
Pune-Beed New Railway Service to Begin Regular

Pune-Beed New Railway Service to Begin Regular

esakal

Updated on

पुणे : बीड-पुणे नवीन रेल्वेचे उद्‌घाटन गुरुवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. यासाठी पुणे रेल्वे प्रशासनाने एका रेकचे नियोजन केले. आता दुसऱ्या रेकसाठीदेखील मुख्यालय स्तरावर डब्यांची जुळवाजुळव सुरू आहे. पुणे-बीड रेल्वेची नियमित सेवा २२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, तर बीडहून या रेल्वेची नियमित सेवा २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या नवीन रेल्वेमुळे मराठवाड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com