JE vaccination : शहरात सव्वा दोन लाख मुलांना मिळाली 'जेई' ची लस; महापालिकेकडून देण्यात येतेय मोफत लस

Vaccination Campaign : पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने १ ते १५ वयोगटातील मुलांसाठी जॅपनीज एन्सेफेलायटीस लसीकरण मोहीम १ मार्चपासून सुरू केली असून, एक महिन्यात २ लाख २६ हजार मुलांना लस देण्यात आली आहे.
Vaccination Campaign
Vaccination CampaignSakal
Updated on

पुणे : जॅपनीज एन्सेफेलायटीस (जेई) सारख्या गंभीर आजारापासून संरक्षण करण्‍यासाठी शहरात १ ते १५ वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘जेई’ ची लस देण्‍यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने १ मार्च पासून मुला-मुलींसाठी लसीकरण मोहीम सुरू केली असून या मोहिमेअंतर्गत महिनाभरात (ता. २६) २ लाख २६ हजार मुला– मुलींना लस दिली गेली आहे. परीक्षा, सुट्ट्यांमुळे येतोय लसीकरणात अडथळा येत असल्‍याने लसीकरण मोहीम धीम्‍या गतीने सूरू आहे. ती पूर्ण करण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com