Bharat Mandapam : लोहगावमधील भारत मंडपम प्रकल्पासाठी एचसीएमटीआरचे आरक्षण रद्द, शासनाच्या अधिसूचनेला स्थगिती देण्यासाठी माजी नगरसेवकांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

HCMTCR Reservation Cancelled for Bharat Mandapam Project in Lohegaon : पुण्यातील लोहगाव येथे भारत मंडपम प्रकल्पासाठी एचसीएमटीआरचे आरक्षण रद्द करण्याच्या शासन निर्णयावर माजी नगरसेवकांनी आक्षेप घेतला आहे. अधिसूचनेला स्थगिती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात येणार असून महापालिकेनेही पाठपुरावा करण्याचे स्पष्ट केले आहे.
HCMTCR Reservation Cancelled for Bharat Mandapam Project in Lohegaon

HCMTCR Reservation Cancelled for Bharat Mandapam Project in Lohegaon

esakal

Updated on: 

पुणे : भारत मंडपम प्रकल्पासाठी लोहगावमधील जागेवरील एचसीएमटीआरचे आरक्षण रद्द करण्याच्या शासनाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली आहे. त्यावर महापालिका प्रशासनाने मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भात चर्चा केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. नगर विकास विभागाने १६ नोव्हेंबर रोजी अधिसूचना काढून सर्वे क्रमांक २३६ आणि २३८ मधील विविध आरक्षणांसह एचसीएमटीआरचा मार्गही रद्द केला आहे.

Loading content, please wait...