पुणे : शहिद जवान नवनाथ भांडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune bhor army man Martyr Navnath Bhande state funeral

पुणे : शहिद जवान नवनाथ भांडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भोर : छत्तीसगड रायपूर येथे शहीद झालेले जवान नवनाथ शंकर भांडे (वय. 41, रा. भोंगवली, ता.भोर) यांच्यावर रविवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी रायपूर येथे देशरक्षणासाठी कार्यरत असताना त्यांना वीरमरण आले. शनिवारी रात्री उशीरा त्यांचे पार्थिव भोंगवलीत आणण्यात आले. रविवारी सकाळ 9 वाजता भोंगवली येथील त्यांच्या शेतात अंत्यविधी करण्यात आला.

नवनाथ भांडे यांच्या अंत्यदर्शनासाठी आमदार संग्राम थोपटे यांच्यासह तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते. अंत्यविधीपूर्वी ग्रामस्थांनी त्यांच्या पार्थिवाची गावातून अंतयात्रा काढली. लष्कराच्या जवानांनी त्यांना सलामी दिल्यानंतर 12 वर्षांचा चिमुरडा मुलगा राज याने त्यांच्या पार्थिवास अग्नी दिला. नवनाथ भांडे यांच्यामागे आई पार्वती, पत्नी विद्या आणि 12 वर्षांचा मुलगा राज असा परिवार आहे. नवनाथ भांडे हे पुढील महिन्यात लष्कराच्या सेवेतून सेवानिवृत्त होणार होते. परंतु त्यापूर्वीच त्यांना वीरमरण आल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Pune Bhor Army Man Martyr Navnath Bhande State Funeral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top