भोसरीत दिव्यांग मुलीवर बलात्कार; आरोपीला पोक्सो कायद्याअंतर्गत अटक

भोसरीत दिव्यांग मुलीवर बलात्कार; आरोपीला पोक्सो कायद्याअंतर्गत अटक

पुणे : सोळा वर्षांच्या दिव्यांग मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी भोसरी परिसरातील एका 23 वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील भोसरी परिसरात झालेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून आरोपीला काल मंगळवारी अटक करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी आपल्या पालकांसमवेत भोसरीमध्ये राहत होती. या घटनेतील आरोपी हा पीडित कुटुंबियांच्या परिचयातला आहे. आरोपी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान त्यांच्या घरी आला आणि त्या मुलीला घेऊन बिल्डींगमधल्या दुसऱ्या खोलीत गेला. त्यानंतर आरोपीने मुलीच्या दिव्यांग असण्याचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

भोसरीत दिव्यांग मुलीवर बलात्कार; आरोपीला पोक्सो कायद्याअंतर्गत अटक
पुण्याचा गडी लढवतोय टोकियोची विधानसभा; नगरसेवक पदावरुन आमदारकीकडे झेप

मुलीच्या पालकांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या आरोपीला कलम 376 (2)(j)(a) तसेच पोक्सो अर्थात Prevention of Children from Sexual Offences Act (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com