Young man’s thumb severed in bike chain accident successfully reattached
पुणे : घरच्या घरी दुचाकीची चेन साफ करताना दुचाकीच्या चेनमध्ये तरुणाच्या हाताचा अंगठा अडकून तो अक्षरशः तुटून पडला. परंतु वेळेत तातडीच्या व तब्बल पाच तासांच्या सूक्ष्म शस्त्रक्रियेनंतर तरुणाचा अंगठा पुन्हा जोडण्यात डॉक्टरांना यश आले. ही आव्हानात्मक शस्रक्रिया वानवडीतील इनामदार रुग्णालयात पार पडली. एका खासगी शिक्षण संस्थेत काम करणारे राहुल जाधव (नाव बदलले) हे १२ डिसेंबर रोजी घरी दुचाकीची चेन स्वच्छ करत होते. यावेळी चुकून त्यांचा हात चेन यंत्रणेत ओढला गेला. अनेकदा अशा प्रकारच्या अपघातात किरकोळ जखमा होतात, मात्र राहुलच्या बाबतीत अंगठा खेचला गेला होता.