Pune : कऱ्हानदीच्या पुरात वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराला पोलिस व ग्रामस्थांमुळे मिळाले जीवदान. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : कऱ्हानदीच्या पुरात वाहून गेलेल्या दुचाकीस्वाराला पोलिस व ग्रामस्थांमुळे मिळाले जीवदान

उंडवडी : कऱ्हावागज ( ता. बारामती) हद्दीत कऱ्हानदीला मंगळवारी आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून चाललेल्या दुचाकीस्वाराला वाचविण्यात माळेगाव पोलिसांना यश आले आहे. दुचाकीस्वाराला जीवदान दिल्याने पोलिस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

साकुर्डी येथील रहिवासी सुनील विश्वास चव्हाण (वय ४३) हे आपल्या दुचाकीवर जेजुरीकडून बारामतीकडे निघाले होते. जळगाव कप ते कऱ्हावागज परिसरातून रस्त्यावरून भरधाव वेगात वाहत असलेल्या पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेला होते. ही बाब माळेगाव पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ पाण्यात जावुन जिवाची बाजी लावून चव्हाण यांना पाण्याबाहेर काढले. ही कामगिरी माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या वेळी पुराच्या पाण्यात स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलिसांनी केली. यामध्ये कॉन्स्टेबल अमजद शेख यांच्या पायाला दुखापत झाली आहे.

चव्हाण यांना वाचविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक साळवे, पोलीस नाईक वायसे, पो ना सानप पोलीस कॉन्स्टेबल मोरे, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस यांनी केली.तसेच पोलीसमित्र रमजान डांगे करावागज सरपंच सचिन नाळे, संतोष काशिनाथ गावडे, मच्छिंद्र मुलमुले, आकाश नाळे, दादासाहेब गुंजाळ, अनिल गावडे यांनीही मदत केली.