Pune BJ Medical College: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापक पदकपातीतून अध्यापन व रुग्णसेवेवर गदा

बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापक पदकपातीतून अध्यापन, रुग्णसेवा व प्रशासकीय कामकाज धोक्यात; सुधारित आकृतीबंध रद्द करण्याची वैद्यकीय शिक्षक संघटनेची मागणी
31 teaching posts cut at BJ Medical College Pune; medical teachers protest revised staffing pattern.

31 teaching posts cut at BJ Medical College Pune; medical teachers protest revised staffing pattern.

Sakal

Updated on

पुणे : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने विविध सहा विभागांसाठी जारी केलेल्या सुधारित आकृतीबंधामुळे बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापकांची पदे कमी झाली आहेत. यामध्ये सहा प्राध्यापक, १२ सहयोगी प्राध्यापक आणि १३ सहाय्यक प्राध्यापक पदांचा समावेश आहे. या निर्णयामुळे अध्यापन, रुग्णसेवा आणि प्रशासकीय कामांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा ‘महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटने’ने केला आहे. यासंदर्भात संघटनेने गुरूवारी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय येथे आंदोलन करत निषेध नोंदविला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com